गिरीविहंग

The below lines describe some of my hiking experiences in a short manner and chronological order. Dedicated to all the people who made it possible for me to live those moments !

*****************************************************************

पहिले पाउल,पहिली स्वारी,
सरसगडाची आठवण ती न्यारी !
मराठी सत्तेची असे पंढरी,
रायगड पाहता तेजोभिमान भरे उरी.

स्वराज्याची प्रथम राजधानी,
राजगडाची थोरवी काय वर्णावी पामरांनी !
नाणे मावळातील त्या बेभान सरींनी,
विसापूर दिधला अथक श्रमांनी.

एकांडा शिलेदार नोकरदारीतला,
लोहगड पाहिला पवनेच्या खोऱ्यातला;
प्रथमच इतुका दाणा-गोटा नेला,
वासोटा तो बेलाग कड्यांचा पहिला;

सवंगड्यांच्या धरसोडीने उद्वेग झाला,
नाणेघाट मग तडफेत सर केला;
गाडीचा घोडा करूनि महामार्ग धरीला,
सुधागड तो कडाक्याच्या थंडीत पावला !

घायकुतीस सर्व भुकेले जीव आले,
आजोबा माझे पानिपत ठरले;
तिसऱ्या स्वारीत यश पदरी पडले,
राजमाचीचे स्वप्नं साकारले !

आला मुंबईवरी म्लेंच्छांचा घाला,
कर्नाळा तरी निर्लज्जपणे गाठीला;
इष्ट मित्राच्या इच्छेस वंदून,
कोथळीगड हि खिशात घातला !

शहाजींनी निकराने जेथून पहिले स्वराज्य लढविले,
माहुलीस त्या त्रिवार वंदन मनोमनी केले;
जे गनिमी काव्याचा मानबिंदू ठरले,
उंबरखिन्डीचे ते उतार पहिले !

खंदे शिलेदार पाठी असता,
कसला शीण,कसली चिंता ?
रोहिडा-रायरेश्वर-केंजळगड ,
झाले सर बघता बघता !

महाराष्ट्र देशीचे उच्चतम शिखर,
कळसूबाईची कीर्ती असे अमर !
कुठे सापडेल बरे ती बखर,
कलावंतीणीची ज्यात असे काही खबर;

खेचरे सर्व जेरीस आली,
प्रबळगडावर जेंव्हा स्वारी निघाली;
साध्या गडभ्रमंतीची सहल झाली,
तिकोणा म्हणजे पातशाही मिरवली !

One thought on “गिरीविहंग

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.