कोकणातील वाड्यांचे शिपणे/शिंपण(हे शिंपण म्हणजे शिमगा नव्हे!).
८०-९० दशकात असे दगडी पाट/दांड दोन वाड्यांच्या मधोमध काढले जायचे. विहिरीतून पंपाने यात पाणी सोडले जायचे. एक दिवस एका वाडीत, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वाडीत असे आलटून पालटून पाणी सोडले जायचे. ठराविक अंतरावर दांडाच्या दोन्ही बाजूस(चित्रात दाखविल्याप्रमाणे) पाणी वाहून जाण्यास मुखे काढली जायची. ज्या वाडीची आज शिपण्याची पाळी नाही त्या बाजूचे मुख कापड किंवा दगडाने बंद केले जायचे व दुसऱ्या बाजूचे उघडे ठेवले जायचे. जी शेकडो नारळ, सुपारी आणि इतर झाडे लगत असायची त्यांचे बुंधे ‘ आळे/आळी ‘ काढून जोडलेले असत. पाणी एका जिथे पडेल तिथून पुढे या आळ्यातून वाहायचे(उतार त्याप्रमाणे काढला जायचा).
ही पद्धत तशी तापदायक होती – पाण्याचा अवास्तव उपसा, आळी नीट काढणे व पाणी साचू नये म्हणून सतत मोकळी ठेवणे, बुजू नयेत म्हणून वरचेवर खणणे यात बराच वेळ व शक्ती खर्च पडे. असे असले तरी यामुळे बराच वेळ आणि शक्ती वाचायची हे ही खरेच.
आता PVC pipes, valves या मुळे optimized सिंचन शक्य झाले आहे, व दगडी पाट ही पद्धत जवळजवळ बंद झाली आहे.




