रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
कोपला रुद्र जे काळी, ते काळी पाहवेचिना ।
बोलणे चालणे कैचे, ब्रह्मकल्पांत मांडिला ।।१।।
ब्रह्मांडाहूनि जो मोठा, स्थूळ उंच भयानकू ।
पुच्छ ते मुर्डिले माथा, पावले शून्य मंडळा ।।२।।
त्याहून उंच वज्रांचा, स्थूळ उंच भयानकू ।
त्यापुढे दुसरा कैचा, अद्भुत तूळणा नसे ।।३।।
मार्तंड मंडळा ऐसा, दोन्ही पिंगाक्ष लाविले ।
कर्करा घर्डिल्या दाढा, उभे रोमांच ऊठिले ।।४।।
अद्भूत गर्जना केली, मेघचि चेविले भूमी ।
फुटले गिरीचे गाभे, तुटले सिंधू आटले ।।५।।
अद्भुत वेश आवेशे, कोपला रणकर्कशू ।
धर्म संस्थापनेसाठी, दास तो उठिला बळे ।।६।