रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
नांव मारुतीचें घ्यावें |
पुढें पाऊल टाकावें ||१||
अवघा मुहूर्त शकुन|
हृदयी मारुतीचें ध्यान ||२||
जिकडे तिकडे जाती भक्त |
पाठी जाय हनुमंत || ३||
रामउपासना करी |
मारुती नांदे त्याचे घरीं ||४||
दास म्हणे ऐसें करा |
सदा मारुती हृदयीं धरा ||५||