रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
येई येई हनुमंता |
माझे अंजनीच्या सुता ||१||
तुझी पाहातों मी वाट |
प्राणसखया मजला भेट ||२||
तुजवाांचोनि मज आतां |
कोण संकटीं रक्षिता ||३||
नको लावूं तू उशीर|
दास बहू चिंतातूर ||४||