शिवाजी महाराज का सांगावेत?

शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या काळजावर कोरलेले नाव! अनिवासी भारतीयांची मुले, जी परदेशात जन्मतात, वाढतात, त्यांना शिवाजी महाराज, स्वराज्य हे सांगणे जितके महत्वाचे तितकेच त्यांना मराठी सत्तेबद्दल रस, अभिमान, आत्मीयता निर्माण होईल अशा पद्धतीने सांगणे हे गरजेचे आहे. याच दिशेने प्रयत्न आम्ही Stockholm मध्ये गेले दोन वर्ष करत आहोत. या वर्षी साधारण २० मिनिटांचे एक presentation … Continue reading शिवाजी महाराज का सांगावेत?

स्वराज्याची गंगोत्री

२००७ साली स्वातंत्र्यदिनी शिवनेरीचे धावते दर्शन झाले. त्यावेळेस काढलेला हा फोटो आज जवळजवळ १४ वर्षांनी सापडला. शिवनेरी, हा महाल म्हणजे स्वराज्याची गंगोत्री म्हणायला हवी. याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे म्हणतात.