I scribbled the below lines between Panvel and Tilak Nagar stations – inspirations aplenty.
These lines are dedicated to all the beauties in this world.
*****************************************************************
गर्दीच्या रेट्यात वा निवांत ठिकाणी,
लाभे अचानक एक सुखद परिमल !
बघावे जरा मन वर करुनी,
दिसे सुंदर एक मुखकमल !
मरगळ मनाची क्षणात होई दुर,
उमेदीची त्वरा येई एक लहर !
दृष्यावरुनी त्या हालवेना नजर,
काय वर्णावा तो सौंदर्याचा बहर !
रूपाच्या असती त्या छटा अनेक,
सात्विक,लोभस,कामुक,निरागस !
प्राशन करावा तुषार तो एक,
सदैव असावा हाची मानस !
घालावा लगाम जरा रसिक भावास !
कि मुखावरी ,त्या रोष न यावा,
मर्यादित राहावा कल्पनाविलास,
डोंगर दुरूनच साजरा करावा !
उरी अंकुर फुटे मनिषेचा,
ठेवा ऐसाच आपणास मिळावा !
कस्तूर-कुपी स्त्रोत प्रेमाचा,
उत्कट,अक्षय आनंद ज्याचा !
अडखळला हो मनाचा वारू,
पहा,सत्य लागले हाक मारू !
नतमस्तक विधात्याच्या कौशल्यापुढती,
सौंदर्याचे दान जेव्हां समोर येती !
लाभे अचानक एक सुखद परिमल !
बघावे जरा मन वर करुनी,
दिसे सुंदर एक मुखकमल !
मरगळ मनाची क्षणात होई दुर,
उमेदीची त्वरा येई एक लहर !
दृष्यावरुनी त्या हालवेना नजर,
काय वर्णावा तो सौंदर्याचा बहर !
रूपाच्या असती त्या छटा अनेक,
सात्विक,लोभस,कामुक,निरागस !
प्राशन करावा तुषार तो एक,
सदैव असावा हाची मानस !
घालावा लगाम जरा रसिक भावास !
कि मुखावरी ,त्या रोष न यावा,
मर्यादित राहावा कल्पनाविलास,
डोंगर दुरूनच साजरा करावा !
उरी अंकुर फुटे मनिषेचा,
ठेवा ऐसाच आपणास मिळावा !
कस्तूर-कुपी स्त्रोत प्रेमाचा,
उत्कट,अक्षय आनंद ज्याचा !
अडखळला हो मनाचा वारू,
पहा,सत्य लागले हाक मारू !
नतमस्तक विधात्याच्या कौशल्यापुढती,
सौंदर्याचे दान जेव्हां समोर येती !
When u sent it I thot ki this was kisi aur ka…Very nice !! Superb…
LikeLike