रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

रामदासांची हनुमानगाथा हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा. जय जय रघुवीर समर्थ! अद्भुत पुच्छ ते कैसे । भोवंडी नभपोकळी । फाकले … Continue reading रामदासी साहकारी । सांभाळितो परोपरी ।।

सागरास किनाऱ्याची ओढ…

जरी सूर्य तळपे आकाशी,निजण्यास त्यास समुद्राची कुशी.गलबतांची सत्ता असे दर्यावरी,परि नजर त्यांची बंदरावरी.जरी असे अथांग आणि अजोड,तरी त्या सागरास किनाऱ्याची ओढ...

भेदिले सूर्यमंडळा

अगदी शाळेत असल्यापासून प्रदर्शनात पाहिलेली पण नुकतीच वाचलेली एक उत्तम कादंबरी. रामदास स्वामींच्या कौमाऱ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास या कादंबरीत मांडला आहे.- तळमळ होती तर नारायणाने मारुतीरायाप्रमाणे झेप घेतली, रामराया मार्ग दाखवेल असा ठाम विश्वास. राणू बाईंचा पुत्रमोह, गंगाधरपंतांचे थोरलेपण आणि पार्वतीचे मायाळू वहिनीपण आणि ठरेलेले लग्न या सगळ्यांचा मोह टाळून.- मोहात अडकून पडणे … Continue reading भेदिले सूर्यमंडळा

कोकणातील वाडीतले दांड/पाट

कोकणातील वाड्यांचे शिपणे/शिंपण(हे शिंपण म्हणजे शिमगा नव्हे!). ८०-९० दशकात असे दगडी पाट/दांड दोन वाड्यांच्या मधोमध काढले जायचे. विहिरीतून पंपाने यात पाणी सोडले जायचे. एक दिवस एका वाडीत, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वाडीत असे आलटून पालटून पाणी सोडले जायचे. ठराविक अंतरावर दांडाच्या दोन्ही बाजूस(चित्रात दाखविल्याप्रमाणे) पाणी वाहून जाण्यास मुखे काढली जायची. ज्या वाडीची आज शिपण्याची पाळी नाही … Continue reading कोकणातील वाडीतले दांड/पाट